नोटांवर ‘लक्ष्मी’चा फोटो लावल्यास रुपया ‘मजबूत’ होईल : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची आर्थिक स्थिती काही दिवसांपासून ढासळत चालली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु आहे. ती रोखायची असेल तर भारतीय रुपयाला मजबूत करायला पाहिजे. असे करायचे असेल तर भारतीय नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावण्यात यावा , असे केले तर भारतीय रुपया मजबूत होईल असे अजिबो गरीब विधान भाजपचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. मध्य प्रदेशच्या खंडवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी इंडोनेशियातील संदर्भ दिला. इंडोनेशियाच्या नोटांवर गणपती नोटावर असल्याने अनेक संकट दूर करतात. त्यामुळे मला वाटते की, भारतीय नोटांवर देवी लक्ष्मी यांचा फोटो असायला हवा. जर भारतीय नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावला तर भारतीय रुपया मजबूत होईल. यावर कोणाचीही वाकडी नजर पडणार नाही, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

एनआरसी कायद्याबाबत बोलताना सुब्रमण्यम म्हणाले , काँग्रेस आणि महात्मा गांधींनी याचे समर्थन केले होते. मनमोहन सिंग यांनी २००३ साली संसदेत याविषयी निवेदन दिले होते, असे स्वामी म्हणाले. भाजप लवकरच युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणार असल्याचा दावाही सुब्रमण्यम स्वामी यांनी यावेळी केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/