भीमा कोरेगाव : तपासात राष्ट्रवादीचे नेते उघड होतील याची त्यांना भीती, भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेली दंगल ही कोणीतरी स्पॉन्सर केली असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. आमचे सरकार असताना शिवसेनाही सोबत होती. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनीही यावर भाष्य केले होते. आता या तपासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते तपासात उघड होतील याची भीती त्यांना आहे, अशी टीका माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

एनआयए ही देशातील सर्वोत्तम संस्था आहे. या संस्थेवर कोणी शंका घेणे योग्य नसल्याचे सांगत एनआयएवर शंका घेणे म्हणजे तुमच्या मनात भीती आहे. आपण एसआयटीची चौकशी लावायची आणि चार्ज फ्रेम होऊ द्यायचा नाही अशी त्यांची इच्छा असावी. या प्रकरणावर शंका उपस्थित करणे योग्य नसल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटल आहे.

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येताच शरद पवार यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले. शरद पवारांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याचा आढावा घेऊन तपास अधिकाऱ्यांकडे पुराव्यांची मागणी केली. या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होणार हे निश्चित असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला झटका दिला. हा तपास केंद्रीय यंत्रणेकडे गेल्याने आता या प्रकरणाचा तपास राज्याला वेगळा तपास किंवा चौकशी करता येणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा –