इंदुरीकर महाराजांच्या मदतीला धावला भाजपचा ‘हा’ नेता

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीबाबत वादग्रस्त विधान केले होते, तेव्हापासून ते प्रचंड ट्रोल होताना दिसत आहेत. अनेक लोकांच्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र त्यांच्या बाजूने आता भाजपाचे मंत्री आणि आमदार सुरेश धस हे धावून आले आहेत. सुरेश धस यांनी इंदुरीकरांची बाजू घेत सांगितले की, ‘कोणी तरी काही बोलले म्हणून राज्य सरकार निवृत्ती महाराजांना नोटीस पाठवत असेल तर, राज्य सरकारच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. जर इंदुरीकर महाराजांवर कारवाई केली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,’ असं म्हणतं त्यांनी सरकारवर प्रखर टीका केली.

सुरेश धस म्हणाले की, ‘इंदुरीकर महाराज जे काही बोलले ते गुरू चरित्रात लिहिलेले आहे. मग त्यात गैर काय आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी सांगितले की इंदुरीकर महाराज आणि PCPNDT कायदा याचा काय संबंध आहे. ही एक मोठी दुर्दैवी बाब आहे असे देखील ते म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, माझं मत असं आहे की वारकरी संप्रदायाची पताका हाती घेवून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचे किर्तन ऐकले जाते, ते म्हणजे इंदुरीकर महाराज. आणि त्यांनाच या सरकारनं नोटीस पाठवली आहे. जे गुरु चरित्रात आहे, पुराणात आहे तेच त्यांनी सांगितले, त्यात काही गैर नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

तसेच सुरेश धस म्हणाले की ‘सातत्याने एका धर्माच्या पाठीमागे लागणे, अगोदर शनी मंदिर, नंतर इंदुरीकर महाराज हे कुठेतरी बंद व्हायला हवे. कोणी काही बोलले म्हणून राज्य सरकारने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली असेल तर राज्य सरकारची मला कीव येते. नोटीस पेक्षा पुढची कारवाई जर झाली तर ते अतिशय दुर्दैवी म्हणावे लागेल. जर कारवाई झाली तर आम्ही शंभर टक्के इंदूरीकर महाराजांच्या पाठीमागे राहू. निश्चितपणे आम्ही त्यांचीच बाजू घेवू,’ असे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच आता राज्यभरातून देखील इंदुरीकरांच्या बाजूनं लोक बोलत आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणते वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.