‘या’ वक्तव्या मुळे मोदींनी ठोकला राहुल गांधींवर मानहानीचा दावा

पटना : वृत्तसंस्था – बिहारमधील भाजपाचे वरिष्ठ नेता आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी सारे मोदी चोर हैं या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.

देशात आज लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. याचदरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यावेळी देशातून फरार झालेल्या नीरव मोदी आणि ललित मोदी यांचे उदाहरण देत सारे मोदी चोर हैं हे वक्तव्य केले होते. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या वक्तव्या वरून भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.

इतकेचक नव्हे तर, राहुल गांधी यांनी भाषणामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करुन मोदी आडनाव असलेल्या व्यक्तींना चोर म्हटले आहे. यामुळे समाजात त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे. त्यामुळे कोर्टामार्फत याची शिक्षा राहुल गांधी यांना झाली पाहिजे. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, भाजपने मतदारांना प्रभावित करण्यासाठी ‘मै भी चौकीदार’ गाणे आणले. यामध्ये भाजपाची निती दाखवण्यात आली. यानंतर याला प्रत्युत्तर देण्यासाठी कांग्रेसने ‘चौकीदार चोर है’ हे कॅम्पेनिंग करण्यास सुरुवात केली. पण आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे ‘चौकीदार चोर है’ जाहीरात आणि व्हिडीओवर बंदी आणली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचार अभियानाला जोरदार झटका लागला आहे.