भाजपा नेत्या अन् TikTok स्टार सोनाली फोगाट यांना अटक

हिसार : पोलीसनामा ऑनलाइन –  काही दिवसांपूर्वी असभ्य भाषेचा वापर केल्यामुळे हिसार मार्केट कमिटीचे सचिव सुल्तानसिंह यांना, भाजपा नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांनी चारचौघात चप्पलेने मारहाण केली होती. तसेच सोनाली यांनी चप्पलेसह त्यांना कानशिलात मारले होते. सोनाली यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी हा व्हिडीओ शूट करुन व्हायरल केला होता. दरम्यान, सोनाली फोगट यांना हिसार मार्केट कमिटीचे सचिव सुल्तानसिंह यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक होती. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतं आहे.

हरियाणातील हिसार मार्केट कमिटीमध्ये काही कारणास्तव सोनाली फोगात यांचा मार्केट कमिटीच्या सचिवासोबत वाद झाला होता. त्यानंतर हे भांडण वाढल्याने सोनाली यांनी थेट सचिव सुल्तानसिंह यांना कानशिलात लगावली होती. नंतर आपल्या पायातील चप्पल काढून त्यांना मारहाण केली. त्यावेळी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला असून, तो सोशल मीडियावरती व्हायरल केला होता. या व्हिडिओत सोनाली यांचा आवाज ऐकायला येत आहे. ‘आप किस तरह से ऐसी बात कर सकते है’… असं त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे.

सोनाली यांनी मार्केट कमिटीच्या सचिवाने त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे, राग अनावर झाल्याने सोनाली यांनी चप्पलेने सचिवाला मारहाण केली. हरियाणात गेल्या विधानसभा निवडणुकीत सोनाली फोगात यांनी आदमपूर मतदारससंघातून माजी मुख्यमंत्री भजनलालचे सुपुत्र कुलदीप बिश्नोई यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. सोनाली फोगात या टिकटॉक स्टार असून, टिकटॉकवर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.