‘राजीव गांधी हेच राहुल गांधींचे वडील आहेत याचा पुरावा काय ?’ : भाजपा नेत्याची जीभ घसरली

लखनऊ : वृत्तसंस्था – राजीव गांधी हेच राहुल गांधी यांचे वडिल आहेत, याचा पुरावा मागितला तर तुम्ही सांगू शकाल का ? असा सवाल भाजपा नेते विनय कटियार यांनी केला आहे. पुरावा मागण्याच्या मुद्द्यावरून विनय कटियार यांनी विजय शंखनाद सभेत बोलतना काँग्रेसचा समाचार घेतला. राहुल गांधी आणि काँग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली. परंतु यावेळी बोलताना त्यांची जीभ घरसल्याचे दिसून आले. उत्तर प्रदेशमधील बस्ती येथे ते बोलत होते.

यावेळी बोलताना विनय कटियार म्हणाले की, “पुलवामा घटनेत आमचे ४५ सैनिक शहीद झाले आणि आज काँग्रेस याचे पुरावे मागत आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीचा पुरावा मागत आहात? जेव्हा बाळ जन्माला येतं, तेव्हा तोच त्या मुलाचा बाप आहे, याची खात्री आईच देते. राहुल गांधींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सोनिया गांधींनी सांगितलं असेल की राजीव गांधी तुझे वडील आहेत. जर याचा पुरावा मागितला तर तुम्ही सांगू शकाल का ?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘काँग्रेस पक्ष आपल्या गर्भातून दहशतवादाला जन्म देतो’

पुढे बोलताना कटियार म्हणाले की, “काँग्रेस पक्ष केवळ एकच करते, आपल्या गर्भातून ते दहशतवादाला जन्म देतात. लष्कराचे जवान कोणाचेही सरकार येईल तेव्हा बुलेटप्रुफ जॅकेट मागत असतात. त्याकडे कोणी लक्ष देत नसतं. पंतप्रधान मोदींनी एक लाख बुलेटप्रुफ जॅकेट मागवले. किमान सीमेवर लढताना सैनिकांना सुरक्षा कवच तर मिळाले. जी-जी चांगली कामे झाली ती सर्व भाजपने केली आहेत.” असेही ते म्हणाले.

‘खिशात ५ रुपये नसणाऱ्यांना मोदींनी उपचारासाठी ५ लाख दिले’

विनय कटियार म्हणाले, “ज्यांच्या खिशात पाच रूपये नव्हते. त्यांना उपचारासाठी पाच लाख रूपये देण्याचे काम मोदींनी केले आहे. देशात दहशतवाद पसरवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. अफजल गुरूसारख्या अनेक जणांनी देशात जन्म घेतला. ही सर्व काँग्रेसचे देण आहे. आज राहुल गांधीही तीच परंपरा चालवत आहेत” असे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना कटियार यांनी प्रियंका गांधी यांच्यावर आपली तोफ डागत त्यांच्यावरही टीका केली.

You might also like