BJP Leader Vinod Arya | ज्येष्ठ भाजपा नेते विनोद आर्या यांच्या मुलाच्या रिसोर्टमधून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला, विनयभंग झाला असल्याचा वडिलांकडून आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्येष्ठ भाजपा नेते विनोद आर्या (BJP Leader Vinod Arya) यांच्या मुलाच्या रिसोर्टमधून बेपत्ता झालेल्या 19 वर्षीय रिसेप्शनीस्ट तरुणीचा मृतदेह अखेर उत्तराखंड पोलिसांना (Uttrakhand Police) सापडला आहे. या तरुणीचा मृतदेह चिल्ला पावर हाऊस (Chilla Power House) या ठिकाणी सापडला आहे. याप्रकरणी विनोद आर्या (Vinod Arya) यांचे सुपुत्र पुलकित यांच्यासह दोन साथिदारांना पोलिसांनी अटकदेखील केली आहे. यादरम्यान आरोपींनी पीडित तरुणीचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा आरोप तिच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. तसेच या सगळ्या घटनेची ऑडिओ क्लिप असल्याचा दावादेखील पीडितेच्या वडिलांनी केला आहे. (BJP Leader Vinod Arya)

 

काय आहे नेमके प्रकरण ?
उत्तराखंडमधील पौरी गर्हवालमध्ये भाजपा नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित यांचे ‘वनतारा’ हे रिसोर्ट आहे. या रिसोर्टमध्ये मृत अंकिता भंडारी (Ankita Bhandari) हि 19 वर्षीय तरुणी रिसेप्शनीस्ट म्हणून काम करत होती. काही दिवसांपूर्वी हि तरुणी अचानक बेपत्ता झाली. यानंतर अंकिताचे वडील आणि पुलकित आर्या (Pulkit Arya) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अंकिता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. (BJP Leader Vinod Arya)

 

यानंतर पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला असता पोलिसांना रिसोर्टजवळील कालव्यात मृत अंकिताचा मृतदेह आढळून आला.
यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पुलकित आर्या, रिसोर्टचे व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहव्यवस्थापक अंकित गुप्ता यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्याची कसून चौकशी केली असता वैयक्तिक वादातून हि हत्या केल्याचे आरोपींनी कबुल केले.
याप्रकरणी तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या घटनेनंतर राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर ‘वनतारा’ रिसोर्ट पाडण्यात आले.

 

Web Title :- BJP Leader Vinod Arya | uttarakhand women missing from the resort of bjp leader son found pulkit arya arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं…

Shivsena Vs Narayan Rane | ‘जास्त बोलायचं नाही, उलट-सुलट बोलाल तर याद राखा’, शिवसेनेचा नारायण राणेंना थेट इशारा

Pune News | धक्कादायक ! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी (व्हिडिओ)