तिकीट कापल्यानंतर विनोद तावडे म्हणाले… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांना डच्चू दिला आहे. सेना भाजप युती झाल्यामुळे अनेक मतदारसंघांचे गणित बदलावे लागले आहे. त्यामुळे विधासभेच्या उमेदवारीसाठी दोन्ही पक्षांनी अनेक बदल केले होते. भाजपने शिक्षण मंत्री राहिलेल्या विनोद तावडे यांना यावेळी तिकीट कापले आहे.

मला तिकीट का दिले नाही याचे आत्मपरीक्षण मी करेल. तसेच पक्षानेही याबाबत आत्मपरीक्षण करावे असे विनोद तावडे यांनी सांगितले. मात्र आता कोणाचे चुकले किंवा कोणाचे बरोबर हा विचार करण्याची वेळ नाही. कारण हा निवडणुकांचा काळ आहे. मीही संघाचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझे खरे उद्दिष्ट हे राष्ट्राचे निर्माण आणि समाजाचे कल्याण हेच आहे, असे मत विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केले आहे.

माझं तिकीट रद्द झाल्यानंतर मला अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन आले. मात्र सध्या निवडणूक आहे त्यामुळे सर्वांनी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे असे तावडे यावेळी म्हणाले. शिक्षणमंत्री असताना मी अनेक चांगले निर्णय घेतले. मात्र तरीही पक्षाने माझे तिकीट का कापले याबाबत मलाही काही माहित नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर अमित शहा आणि इतर पक्षश्रेष्ठींशी याबाबत बोलेल असे मत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तावडे यांनी व्यक्त केले आहे.

visit : Policenama.com