‘…म्हणून शिवसेनेला देवेंद्र फडणवीसांची आठवण झाली’, भाजपची शंका

पोलिसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना अडचणीत आल्यानंतर सरकारला देवेंद्र फडणवीसांची आठवण झाली,’ असा सूर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधून उमटत आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यामुळे आता सगळा दोष फक्त सरकारकडे जाऊ नये याकरता शिवसेना आता फडणवीसांची चर्चा करायला सरकार तयार झाल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेकडून ’यापूर्वी कोणत्याही बैठकीला भाजपला निमंत्रण नव्हते. सरकार अडचणीत आल्यावर भाजपची आठवण झाली, पण भाजप मराठा आरक्षण प्रकरणी सरकारला पूर्ण सहकार्याची भूमिका घेणार आहे,’ असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मराठा आरक्षण कायदा, राज्यातील विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश, भरती प्रक्रीया तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा याबाबत आज मुख्यमंत्र्याचा वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्यास दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे राज्यातील विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश यांच्यासह, भरती प्रक्रीया यांच्या अनुषंगाने झालेल्या परिणामाबाबत विस्ताराने आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे आणि उमेदवारांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.