home page top 1

Video : भाजपा नेत्यांना बुटाने मारा : ओमप्रकाश राजभर

मऊ (उत्तर प्रदेश) : उत्तरप्रदेशमधील सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (सुभासपा) चे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजप नेत्यांना बुटाने मारा असे सांगितले आहे. ओमप्रकाश यांचा पक्ष भाजप सरकार सोबत सहयोगी पक्ष राहिला आहे.

सोशलमिडीयावर ओमप्रकाश यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत माजी मंत्री ओमप्रकाश राजभर भाजप नेत्यांविरुद्ध अपशब्द आणि अभद्र भाषा उच्चारताना दिसत आहेत.

“भाजपा नेताओं को दस-दस जूते मारो” असे त्यांनी म्हंटले आहे.

योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेले राजभर म्हणाले कि ओबीसींच्या मतांसाठी भाजप नेत्यांनी आमच्या पक्षाचा वापर करून घेतला. भाजप नेत्यांना लाज वाटली पाहिजे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (सुभासपा) या नावाचा वापर भाजप नेत्यांनी प्रचारा दरम्यान केला.

ते म्हणाले कि मी निवडणूक आयोगाला हे ‘भ्रामिक प्रचार अभियान’ रोखण्यासाठी लिहिले होते, परंतु निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही.

Loading...
You might also like