भाजप नेता असल्याचे सांगताच पोलिसांनी आणखी चोपले

कानपूर : वृत्तसंस्था – येथील पनकी इंडस्ट्रीयल परिसरातील कॅनॉलच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यावरुन दोन गटांत वाद सुरू झाला. त्यावेळी पनकी इंडस्ट्रीयल विभागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, स्थानिक भाजप नेत्याने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने आपण भाजप नेता असल्याचे सांगताच पोलीस अधिकाऱ्याने या नेत्याला आणखी चोपले आणि पोलीस कोठडीत टाकले.

दबौली येथील अजय पाल अज्जू हे भाजपाच्या ओबीसी प्रवर्गाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. पनकी इंडस्ट्रीयल परिसरात अज्जू यांच्या एका मित्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी रात्री या बांधकामाच्या उभारणीवरुन शेजाऱ्यांशी वाद झाला. त्यावेळी, अज्जू यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तर, प्रभारी पोलीस अधिकारी अशोक वर्मा हेही तिथे पोहोचले. त्यावेळी भाजप नेते अज्जू आणि पोलीस अधिकारी वर्मा यांच्यात शाब्दीक वाद झाला. त्यानंतर मी भाजप नेता असल्याचे अज्जू यांनी पोलीस अधिकाऱ्यास सांगितले. त्यानंतर मुळ वाद राहिला बाजूला. पोलीस अधिकारी आणि भाजप नेत्यामध्ये नवा वाद सुरु झाला. पोलिसांनी त्याला शिवीगाळ करीत तसेच भाजप नेता आहे, मग तर तुला मारहाण करणाऱ्याचा अधिकार आहे का असा रोखही पोलिस अधिकाऱ्याने बोलून दाखवला.

रविवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच, शेकडो भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांच्या हुकमशाहीला आम्ही कदापी सहन करणार नाही, अशी घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.

दरम्यान, कल्याणपूर सीओ राजेश कुमार पांडेय आणि एसएसपी अनंत कुमार यांनी प्रभारी पोलीस अधिकारी अलोक वर्मा यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच भाजप कार्यकर्ते शांत झाले. तसेच अलोक वर्मा हजर झाल्यानंतरच, भाजपा कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून निघून गेले.

 

भाजप नगराध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत : माजी मंत्री पाचपुतेंना मोठा धक्का