आघाड्या कायम राहिल्यास सत्तापरिवर्तन, एबीपी माझा, सी व्होटर सर्वेक्षण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

सध्याच्या राजकीय आघाड्या कायम राहिल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए २७६ जागा मिळवून सत्ता राखेल. मात्र, शिवसेना स्वतंत्र लढली, आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या मित्रपक्षांनी साथ कायम राखली तर काँग्रेसप्रणित यूपीए २४४ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहील. इतर पक्षांना ७१ जागा मिळतील आणि त्यांच्याहाती सत्तेची सूत्रे राहतील, असा निष्कर्ष एबीपी माझा वृत्तवाहिनी आणि सी व्होटर संस्थेच्या देशव्यापी सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75480aa5-c84e-11e8-9236-631f43e795e7′]

महाराष्ट्रातील आत्ताची राजकीय समीकरणे कायम राहिल्यास एनडीएला राज्यात ३६ जागा मिळतील, म्हणजेच शिवसेना एनडीएसोबत असूनही २०१४पेक्षा संख्याबळ पाचने घटेल. तर, यूपीएच्या जागा सहावरून १२वर जातील. शिवसेना स्वतंत्र लढल्यास मात्र एनडीएला फक्त १६ जागांवर समाधान मानावे लागेल. यूपीए तब्बल ३० जागांवर झेंडा फडकावेल. यात शिवसेनेला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागेल, असे हे सर्वेक्षण सांगते. चारही पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप २२, काँग्रेस ११, राष्ट्रवादी ८, शिवसेना ७ असा निकाल लागू शकतो. कोणता पक्ष देशापुढील प्रश्न सक्षमतेने हाताळू शकतो, या प्रश्नावर काँग्रेस २१.९, भाजपा ३२.६, राष्ट्रवादी ३.८, इतर ७.३, कोणीच नाही १८.१, माहीत नाही १५.६ अशी पसंती मिळाली आहे. तर महाराष्ट्रात आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाच्या नेतृत्वासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत, असे सांगणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांना ५६.६ टक्के पसंती मिळत असताना, राहुल गांधी १८.७ टक्के, तर शरद पवार ९.९ टक्के लोकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत.

शिक्षण मंडळ नाही शिक्षण समितीच

राफेल करार, पेट्रोल-डिझेल-घरगुती गॅसची दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या मुद्यावर विरोधकांनी मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण २०१९ च्या निवडणुकीत लोकांचा कल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. एबीपी आणि सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१९ मध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील. पण २०१४ च्या तुलनेत जागा कमी होतील असा अंदाज या सर्वेत वर्तवण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B0130YUUKW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’59516c8f-c84f-11e8-9d9d-3b805f4aa86e’]