‘EXIT POLL’ नंतर सट्टा बजारातही भाजपचा झेंडा ‘फडफडतोय’ ; एनडीच्या ‘एवढ्या’ जागा घटणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडताच एक्झिट पोलच्या अंदाजामुळे पुन्हा एकदा देशात सत्ताधारी भाजपाची सत्ता येणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. त्याचबरोबर सट्टा बाजारात देखील भाजपचं पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज बांधला जात आहे.

मात्र खरी सत्ता हि २३ तारखेनंतर कुणाला मिळेल हे स्पष्ट होईलच, मात्र तोपर्यंत भाजप समर्थक आणि कार्यकर्ते जल्लोषात दिसणार आहे मात्र नक्की. २०१४ प्रमाणेच पुन्हा भाजप सत्तेत येणार असे सट्टाबाजारातील आकडे सांगत आहेत, मात्र त्याचबरोबर भाजपच्या जागा कमी होतील असा अंदाज देखील सट्टाबाजारात वर्तवला जात आहे.

कोणत्या ठिकाणी काय अंदाज

१) भाजपला २३८ ते २४५ जागा मिळतील असा अनेक शहरातील सट्टा बाजारांचा अंदाज आहे.
२) भाजपला २४२ ते २४५ जागा मिळतील असा राजस्थानमधील सट्टा बाजाराचा अंदाज आहे.
३) भाजपला २३८ ते २४१ जागा मिळतील असा दिल्लीतील सट्टा बाजाराचा अंदाज आहे.
४) भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ३०० पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा मुंबईच्या सट्टा बाजारानं केला आहे.

काँग्रेसला किती

दरम्यान सट्टाबाजारात विरोधी पेक्षा काँग्रेसला किती जागा मिळतील यावर देखील सट्टा लावण्यात आला आहे. मुंबईतील सट्टा बाजारात काँग्रेसला आणि त्यांच्या मित्रपक्षांना १५० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याचबरोबर सत्ताधारी भाजपच्या पराभवावर देखील सट्टाबाजारात पैसे लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता सट्टाबाजारात कुणाचे नुकसान होते आणि कुणाचा फायदा होतो हे येत्या २३ तारखेलाच कळणार आहे.