‘महाविकास’आघाडीच्या ‘आम्ही 162’ नंतर भाजपाकडे उरले फक्त ‘हे’ 4 पर्याय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकाराचा शपथविधी झाला. यानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारला. दरम्यान, महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. याचिकेचा निकाल उद्या येणार आहे. या सगळ्या घडामोडीनंतर भाजप विधानसभेत बहुमत सिद्ध करणार का ? आणि कसे सिद्ध करणार यासंबंधी 4 शक्यता आहेत.

शक्यता 1
अजित पवारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला. मात्र अजित पवारांच्या पाठिमागे एकही आमदार नसल्याचे आघाडीकडून सांगितले जात आहे. जर असे झाले तर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत येतील किंवा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील. त्यामुळे भाजपचे सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरेल. तसे झाले तर फडणवीस फ्लोअर टेस्ट आधीच स्वत: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.

शक्यता 2
अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. अजित पवार यांना व्हीप काढण्याचा अधिकार असल्याचा दावा भाजपने केला. मात्र, राष्ट्रवादीकडून हा दावा खोडून काढला आहे. जयंत पाटील नवे गटनेते असून तेच व्हिप काढतील असे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. अजित पवार हे गटनेते असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी मान्य केले तर ते व्हिप काढतील आणि भाजप तांत्रिकदृष्ट्या बहुमत असण्याची शक्यता वाढेल.

शक्यता 3
पक्षांतर कायद्यानुसार दुसऱ्या पक्षाला पाठिंबा द्यायचा असेल तर दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा लागतो. राष्ट्रवादीचे 54 आमदार असून अजित पवारांना 41 आमदारांचा पाठिंब्याची गरज आहे. शरद पवारांनी या कायद्यांतर्गत आमदारांवर कारवाई केली तर भाजप बहुमत सिद्ध करु शकणार नाही.

शक्यता 4
भाजपकडे 105 जागा आहेत. अजित पवारांना 20 ते 25 आमदारांचा पाठिंबा आहे, असे बोललं जातंय. त्यामुळे आवाजी मतदान घेतलं तर गदारोळात काहीही होऊ शकतं. हे सगळे आमदार आणि अपक्ष मिळून फोडाफोडीच्या राजकारणात भाजप बहुमत सिद्ध करु शकतं. आता बहुमत सिद्ध करण्यादिवशी काय होते याकडे राज्याचे तसेच देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Visit : Policenama.com