एकनाथ खडसेंबाबत पक्षाने घेतला ‘हा’ निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भाजपने आपल्या पहिल्या यादीमध्ये स्थान दिले नाही. त्यामुळे खडसे यांनी उमेदावारी अर्ज दाखल करून पक्षनेतृत्वाला अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे. भाजपची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार असून या यादीमध्ये देखील खडसे यांचे नाव नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या ऐवजी त्यांच्या कन्येला तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खडसे यांना पक्षाने बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर न केल्याने नाराज झालेल्या एकनाथ खडसे यांनी गेली 40 वर्ष प्रामाणिकपणे काम करूनही आपल्याला असं का वागवण्यात आलं याबाबत मी विचारणार आहे. माझा काय गुन्हा आहे ते तरी सांगावं असं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. मागील 40 वर्षापासून प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाशी प्रामाणिक राहणे, हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

मागील सहा वेळेपासून भाजपकडून मुक्ताईनगर येथून निवडून आणलेले एकनाथ खडसे यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याने त्यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पहिल्या यादीत नाव नसल्याने नाराज झालेल्या एकनाथ खडसेंना दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल असा आशावाद आहे. मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या यादीत त्यांचे नाव नाही. 2014 च्या निवडणुकीनंतर खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपानंतर खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. आपल्याला तिकीट नाकारणार असल्याचा अंदाज आल्यानेच खडसे यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला होता. नंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपली दु:ख व्यक्त केलं होतं.

Visit : Policenama.com