साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या दहशतवादाच्या आरोपी आहेत त्यांना परत तुरुंगात टाका : ओमर अब्दुला

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या दहशतवादाच्या आरोपी आहेत. सध्या त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. त्यांचा कोर्टाने जामीन रद्द केला पाहिजे. असे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुला यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदार संघासाठी भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरु आहे. देशात दुसऱ्या टप्यातील मतदान आज सुरु आहे. याचदरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची तब्येत ठीक झाली असेल तर त्यांना परत तुरुंगात पाठवले पाहिजे. भोपाळ मतदार संघातून भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. यापेक्षा भाजपाचे मोठे दुर्दैव काय असू शकते.असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुला यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या दहशतवादाच्या आरोपी आहेत. सध्या त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. त्यांचा कोर्टाने जामीन रद्द केला पाहिजे. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, मध्यप्रदेशातील उमेदवारांची यादी भाजपाने काल जाहीर केली. यामध्ये भोपाळ मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्या काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

You might also like