प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही ‘फॅशन’, भाजपच्या ‘या’ नेत्यानं पवारांचं समर्थन करत पडळकरांना सुनावलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धनगर समाच्याच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारवर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यात याचे पडसाद उमटले. शरद पवारांवरी विधानावर आता भाजपच्या एका नेत्याने पवारांचे समर्थन करत पडळकरांना सुनावलं आहे.

शरद पवार यांच्यावर टीका ही दुर्दैवी आहे असं मत मधुकर पिचड यांनी व्यक्त केलं आहे. आपण भाजपा पक्षात जरी असलो तरी शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यांना जवळून पाहिलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही, हे निषेधार्थ आहे असं पिचड यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दु:ख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन झाली असल्याचे मधुकर पिचड यांनी म्हटलं आहे.

आपण भाजपमध्ये असलो तरी शरद पवार यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांना जवळून पाहिले आहे. त्यांनी सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वच स्तरातील लोकांसाठी भरीव काम केलं आहे. त्यांचे हे योगदान नाकारून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नी जण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही, हे निषेधार्थ आहे. शरद पवार यांच्यावर राजकीय टीका अनेक वेळा झाली असेल पण ते निश्चल आहेत. अशा प्रकारच्या टीकांनी ते कधिच अस्थिर झाले नाहीत. छोट्या कार्यकर्त्यांवर माझा नेहमी सूचना असतात. मोठ्या माणसांवर बोलताना आपली कुवत पाहून मर्यादा पाळाव्यात असा शब्दात पिचड यांनी पडळकरांना फटकारलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like