BJP Maharashtra | झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या षडयंत्राचे महाराष्ट्र भाजपशी ‘कनेक्शन’? नेते अडचणीत येण्याची शक्यता

रांची : वृत्तसंस्था – BJP Maharashtra | झारखंड (Jharkhand) मध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार (Hemant Soren Government) पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार सुरु असल्याची तक्रार आमदार अनुप सिंह (MLA Anup Singh) यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी छापे (Police raid) मारले. एका हॉटेलमधील छाप्यात पोलिसांनी तीन अटक करण्यात आली. अभिषेक दुबे (Abhishek Dubey), अमित सिंह (Amit Singh) आणि निवारण महतो (Nivaran Mahato) अशी त्यांची नावे असून त्यांचे महाराष्ट्र कनेक्शन (BJP Maharashtra) समोर आले आहे.

पोलिसांच्या कारवाईवर संशय

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरच आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी महाराष्ट्रातील भाजप (BJP Maharashtra) पदाधिकाऱ्यांच्या भेटींमागे असलेले हवाला कनेक्शन (Hawala connection) लपवण्यासाठी सरकार पाडण्याच्या कटाचे प्रकरण उभे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी महाराष्ट्रातील नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

अन्यथा यांनाही अटक केली असती – पोलीस

हॉटेल ली-लॅकमध्ये (Hotel Le Lac Ranchi) अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण महतो हे तिघे 21 जुलैला जयकुमार बेलखोडे (Jayakumar Belkhode), मोहित कंबोज (Mohit Kamboj), अनिल कुमार, जयकुमार शंकरराव (Jayakumar Shankarrao) आणि आशुतोष ठक्कर (Ashutesh Thakkar) यांना भेटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी ज्यावेळी छापा टाकला तत्पूर्वीच 15 मिनिट आधीच हे सर्व नेते निघून गेले होते. नाहीत तर त्यांनाही अटक (Arrest) करण्यात आली असती. भाजपचे माजी आमदार व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांचा जयकुमार बेलखोडे भाचा आहे, तर मोहित कंबोज हे मुंबईतील मोठे व्यावसायिक व मुंबई प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष आहेत, तर दुबे हा फळ विक्रेता असून, सिंह हा ठेकेदार आहे.

BJP Maharashtra | bjp leaders maharashtra trouble over conspiracy overthrow jharkhand government exposed

पोलिसांचा सरकार पडण्याचा दावा

झारखंडमध्ये सरकार पाडणे भाजपसाठी सहजासहजी शक्य नाही. कारण भाजपचे केवळ 25 आमदार असून बहुमतासाठी 42 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे आता पोलिसांनी जो सरकार पडण्याचा दावा केला आहे त्यावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी ज्या संशयितांना ताब्यात घेतले आहे ते किरकोळ व्यावसायिक आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचे कारस्थान रचण्याची काय गरज पडली ? झारखंडमध्ये नेत्यांची कमतरता आहे का ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. रांची पोलिसांनी एसआयटी (Ranchi SIT) स्थापन करून हॉटेलपासून विमानतळापर्यंत विविध ठिकाणी तपासामध्ये गुंतले आहेत.

एसआयटी नेमून चौकशी करा

सोरेन सरकारवर महाराष्ट्राप्रमाणेच पोलिसांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी (Babulal Marandi) यांनी आरोप केला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मरांडी यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांचे हवाला कनेक्शन?

हवाला कॉरीडोर म्हणून महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि छत्तीसगढचा परिसर ओळखला जातो.
त्यामुळे मोठ्या आर्थिक देवाण घेवाणीसाठी महाराष्ट्रातील पदाधिकारी आरोपींना भेटले असावे. असा
संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हवालाऐवजी सरकार पाडण्याच्या कटाचे प्रकरण पोलिसांनी उभे केले. राज्यातील बडे नेते हवाला अँगलमध्ये अडकले असते आणि परिणामी सरकारची बदनामी झाली असती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा

Pollution And Coronavirus | सावधान ! प्रदूषणामुळे सुद्धा पसरतो कोरोना, भयावह आहे रिसर्चमध्ये झालेला खळबळजनक खुलासा

Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनचे 97 व्या वर्षात पदार्पण

Maharashtra Rain Alert | कोल्हापूर, रायगडसह रत्नागिरीवर पुन्हा मुसळधार पावसाचं संकट, पुण्यासह ‘या’ 6 जिल्हयांना ‘यलो अलर्ट’

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  BJP Maharashtra | bjp leaders maharashtra trouble over conspiracy overthrow jharkhand government exposed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update