हे घड्याळ तर भंगारात जाणार, भाजपाचा राष्ट्रवादीवर ‘नेम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या लोकसभा निवडणूकीला आणि 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाण सोशल मिडियाचा वापर करण्यात आला. सोशल मिडियावर एवढा भर देण्यात आला की जिथे तिथे प्रचार आणि प्रचारच दिसून येत होता. सोशल मिडियाच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षांकडून सारासार सोशल मिडियाचा वापर करण्यात आला.

आता चर्चा आहे ती भाजपच्या रम्याची. या रम्याच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल करण्यात येत आहे. रम्याचा डोस या माध्यामातून भाजपकडून विरोधकांना डोस भरण्यात येत आहे. आता देखील या व्यंग्यचित्रातून टीका करताना रम्याने राष्ट्रवादी आणि अजित पवारांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. यात चिमटा काढताना राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बिघडलं असून आता ते भंगारात जाणार असल्याचे सांगितले.

शरद पवार आणि ईडी प्रकरण सुरु असताना अचानक अजित पवार यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला. या तडकाफडकी राजीनाम्याची कल्पना शरद पवारांना देखील नव्हती. याच घटनेवर रम्याने डोस भरला आहे.

भाजपच्या रम्याने चिमटा काढताना म्हणले की, ईव्हीएम, कलम 370 असो किंवा भगवा झेंडा, दोघांची मत परस्परां विरूद्ध. दादांनी राजीनामा सुद्धा काकांना न विचारता दिला आणि त्यांना भेटल्यावर दादा म्हणतायेत ‘काका सांगतील तो अंतिम निर्णय’ असे एक व्यक्ती रम्याशी संभाषण करताना दाखवण्यात आली आहे. त्यावर रम्याही त्यांना उत्तर देतो. अरे हे घड्याळ ना, एक फटका दिला की थोडावेळं बरोबर चालतंय. पण नंतर मिनिट काटा आणि तास काटा विरूद्ध दिशेने फिरायला लागतात. हे आता काही दुरूस्त होणार नाही, भंगारातचं जाणार.

Visit : Policenama.com