BJP Maharashtra | ’50 वर्षीय राजकारणात तुम्ही किती मेट्रो प्रकल्प पुण्यात आणले?, कौतुक करण्याचा तरी मनाचा मोठेपणा दाखवा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – BJP Maharashtra | पुणे मेट्रोच्या (Pune Metro) उद्घाटनावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी, मेट्रो उद्घाटनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टोला लगावला आहे. अशातच भाजपने (BJP Maharashtra) पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना थेट पवारांवर निशाणा साधला आहे.

 

50 वर्षीय राजकारणात तुम्ही किती किलोमीटरचे मेट्रो प्रकल्प (Pune Metro Project) पुण्यात केले ?, ज्यांनी केलं त्यांचं कौतुक करण्यासाठी तरी मनाचा मोठेपणा दाखवा, असं महाराष्ट्र भाजपने (BJP Maharashtra) म्हटलं आहे. ट्रायलसाठी लगबगीने गेलात, आता म्हणता अर्धवट काम ? पवार साहेब हा फोटो पुणे मेट्रोतील असल्याचं म्हणत महाराष्ट्र भाजपने पवारांचा मेट्रोतील फोटो शेअर केला आहे. भाजपने केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले शरद पवार ?
मेट्रोच्या प्रमुखांनी मला एक महिन्यापुर्वी मेट्रो दाखवण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मी मेट्रोतून (Metro) प्रवासही केला तेव्हा मेट्रोचं काम पूर्ण झालं नसल्याचं माझ्या लक्षात आलं. आता काम झालेलं नसतानाही उद्घाटन होत आहे, याबाबत माझी काहीही तक्रार नसल्याचं शरद पवार म्हणाले.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महापालिकेमध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं.
त्यानंतर गरवारे येथे पुणे मेट्रोचं उद्घाटन केलं.
गरवारे कॉलेज पासून ते आनंदनगरपर्यंत मेट्रोने प्रवास केला आणि एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात शेवटी भाषण केलं.
याप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोशारी (Bhagat Singh Koshari), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar),
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athavale), राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई (State Industry Minister Subhash Desai), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde),
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis), प्रविण दरेकर (Pravin Darekar),
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार प्रकाश जावडेकर (MP Prakash Javadekar),
गिरीश बापट (Girish Bapat), पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे (Pimpri Chinchwad Mayor Mai Dhore),
उपमहापौर सुनीता वाडेकर (Deputy Mayor Sunita Wadekar),
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Standing Committee Chairperson Hemant Rasne),
भाजप पक्षनेता गणेश बिडकर (BJP Party Leader Ganesh Bidkar), भाजपचे आमदार उपस्थित होते.

 

Web Title :- BJP Maharashtra | How many metro projects have you brought to Pune in 50 years of politics BJP

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा