Bihar Assembly Election 2020 : … तर बिहारच्या जनतेला कोरोनाची लस मोफत देऊ, भाजपाचा जाहीरनामा निर्मला सीतारामन यांच्या हस्ते प्रसिघ्द

पोलीसनामा ऑनलाईनः भाजपने आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (BJP’s manifesto for Bihar Polls) आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाची लस (free-corona-vaccination) मोफत देऊ असे आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Union Finance Minister & BJP leader Nirmala Sitharaman) यांनी गुरुवारी (दि. 22) सकाळी साडे दहाच्या सुमारास हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

बिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाचा लस मोफत दिली जाईल असं जाहीरमान्यात म्हटलं आहे.

बिहारमधील प्रत्येक नागरिकाला (all citizens) येथील राजकीय परिस्थितीचा योग्य अंदाज आहे. पक्षाने दिलेल्या आश्वासनांबद्दल त्यांना योग्य माहिती आहे. कोणी आमच्या जाहीरनाम्यासंदर्भात प्रश्न विचारल्यास आम्ही त्याला योग्य उत्तर नक्कीच देऊ शकतो. आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने योग्य पद्धतीने पूर्ण केल्याचं आत्मविश्वासाने सांगू शकतो, असं सीतारामान यांनी यावेळी म्हटलं आहे.

भाजपच्या जाहिरनाम्यातील आश्वासने

1) कोरानाची लस आल्याबरोबर निःशुल्क देणार
2) मेडीकल/इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार
3) 3 लाख शिक्षकांची भरती करुन घेणार
4) बिहारला आयटी हब बनवणार, 5 लाख रोजगार देणार
5)1 कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार
6) एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार
7) बिहारमधील दरभंगामध्ये 2024 पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची (एम्स) उभारणी करणार
8) धान्य आणि गव्हाबरोबरच आता सरकार डाळीही विकत घेणार
9) 2022 पर्यंत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील 30 लाख लोकांना पक्की घर बांधून देणार
10) दुग्ध उत्पादनासंदर्भातील 15 नवे उद्योग सुरु करणार
11) गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात एक वर्षात बिहारला पहिल्या क्रमांकावर आणणार

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like