राज्यात पुन्हा राजकीय ‘भूकंप’ ! राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले ‘ते’ नेते पुन्हा घड्याळ घालणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ‘पक्ष माझ्या बापाचा आहे असे मी का म्हणू नये ‘, मी बंडखोरी का करु ? मी पक्ष सोडणार नाही. त्यामुळे आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे, असे म्हणत पंकजांनी मनातील खदखद समर्थकांसमोर व्यक्त केली. यानंतर आता यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात भूकंप येण्याची शक्यता आहे. मलिक एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. यावर भाजपचे अनेक दिग्गज नेते आमच्या संपर्कात आहेत. जे नेते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले ते आमदार देखील आमच्या संपर्कात असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून ते नेते नेमके कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

भाजपवर नारज असलेले एकनाथ खडसे यांनी निकालानंतर भाजपवरील नाराजी स्पष्टपणे उघड केली. पक्षातील नेत्यांनी विरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केला. परळीत गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात देखील त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. एवढेच नाही तर पंकजा सांगत नाहीत मात्र माझा काही भरवसा नाही असे सांगत खडसे यांनी पक्ष सोडण्याचे संकेत गुरुवारी गोपीनाथ गडावरून दिले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/