उत्तर प्रदेश भाजपमध्ये बंडाची तयारी? 126 आमदार झेंडा बदलण्याच्या मनस्थितीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका सात महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधीच योगी सरकार म्हणजेच भाजप ला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. योगी सरकारमधील एका मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार भाजपमध्ये मोठ्या बंडाची तयारी सुरु झाली असून सरकारमधील १२६ आमदार (MLA) दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान काही दिवसापासून योगी सरकारमधील मंत्री आणि आमदारांचे (MLA) काहीही ऐकून घेतले जात नाही, त्यांना महत्त्व दिले जात नसल्याचे नाराजी बोलले जात होते मात्र आता बंडाच्या तयारीमुळे यावर शिक्कमोर्तब झाला आहे.

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

काही दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ सरकार च्या स्थितीचे आकलन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामार्फत राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी अन्य सदस्यांसोबत केले होते.
त्यानंतर सर्व काही ठीक असल्याचे सांगत नेतृत्त्वात बदल होणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.
त्यानंतर आता बी. एल. संतोष आणि अन्य केंद्रीय नेत्यांनी लखनौत बैठक घेतली पण त्यामध्ये केवळ कोरोना स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवरच चर्चा झाली.
त्यावेळी थेट आमदारांशी (MLA) संवाद साधण्यात आला नसल्याचे मंत्री बृजेश पाठक यांनी सांगितले.

आता घरबसल्या स्वतःच करा 250 रुपयात कोरोना चाचणी ! 15 मिनिटात अहवाल तुमच्या हातात ICMR कडून टेस्ट किटला परवानगी

बंडाचे निशाण

सरकारकडून आमदारांना (MLA) महत्त्व दिले जात नाही. कोणी बोलले तर त्याला कायद्याचा धाक दाखवून त्याला शान्त बसवले जाते.
यावरून सरकारविरुद्ध भाजपचे आमदार  राकेश राठोड यांनी आधीच बंडखोरीचे निशाण फडकावले आहे.
तर फिरोजाबादचे आ. राम गोपाल लोधी यांच्यासह दुसरे आमदारही भाजपविरोधी भूमिका घेत निवडणुकीआधी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत दिसतात.
या बंडखोर आमदारांवर बसपा आणि समाजवादी पार्टी लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत

भाडेकरूंसाठी खुशखबर ! 2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये घरमालक

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर

Coronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू