Video : भाजपच्या दिग्गज मंत्र्यानं मतांसाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं ! व्हायरल झाला व्हिडीओ

भोपाळ : वृत्तसंस्था –    सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे ज्यात एक मंत्री मतांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यासमोर विनवणी करताना दिसत आहे. परंतु यानंतरही काँग्रेस कार्यकर्ता मंत्र्यानं दिलेलं प्रपोजल घेण्यास तयार नाही. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

ग्वालिअरध्ये काँग्रेस पार्टी बदलून भाजपमध्ये गेलेले प्रद्युम्न सिंह तोमर या व्हायरल व्हिडीओत दिसत आहेत. ते आपल्या जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यासमोर मतांसाठी विनवणी करताना दिसत आहेत. ते वारंवार त्याला विनंती करत आहेत. इतकं की शेवटी मंत्र्यांनी गुडघे टेकवून त्याच्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते अरुण यादव यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, पहा कसं एका लाचार मंत्र्यानं काँग्रेसच्या टीकाऊ कार्यकर्त्यासमोर गुडघे टेकले. काँग्रेसचे काही नेते बिकाऊ असू शकतात. मात्र काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता टिकाऊ आहे.

प्रद्यु्म्न सिहं तोमर हे भाजपमधील दिग्गज मंत्री आहेत. ते ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते वारंवार काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधत असतात. त्यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानं मोठा गोंधळ उडाला आहे. ते काँग्रेस नेत्याच्या पायावर डोकं ठेवायचाही प्रयत्न करताना दिसत आहे.

You might also like