शिवरायांच्या पुतळयाच्या खांद्यावर हात ठेवून भाजप मंत्र्याने काढला फोटो

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगर महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढले आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या या कृतीमुळे संतापाची लाट उसळली असून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील शिवस्मारकाची उंची वाढविण्यावरून भाजपच्या एका आमदाराने सभागृहात शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला होता. आता पुन्हा असाच प्रकार घडला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’74845a79-c39e-11e8-93c1-870ce388dd0d’]

उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होती. विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने भाजपाच्या पंचम कलानी बिनविरोध निवडून आल्या. विजयी झाल्यानंतर पंचम कलानी, ओमी कलानी यांनी शिवरायांच्या पुतळयाला अभिवादन केले. त्याचवेळी रवींद्र चव्हाण यांनी शिवरायांच्या पुतळयाच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढले. या फोटोंवरुन रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका होत आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाल्याने त्याचे आणखी संतप्त पडसाद उमटत आहेत.

होंर्डिंगच्या बेकायदा परवाना फी वसुलीला 4 वर्षांनी घेतली मंजुरी

भाजपकडून शिवरायांबाबत असे प्रकार सातत्याने घडत असल्याने आता भाजप अडचणीत आले आहे. शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा उपमहापौर छिंदमचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. आता तोच छिंदम पुन्हा भाजपच्या कार्यक्रमात झळकू लागला आहे. काही दिवसांपूर्वी विधीमंडळ अधिवेशनातही भाजपचे आमदार भातकळकर यांनी शिवस्मारकाच्या उंचीवरून वादग्रस्त विधान केले होते. आता पुन्हा उल्हासनगरात हा संतापजनक प्रकार घडला आहे.

[amazon_link asins=’B00985419O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f356431-c39e-11e8-8c12-09b324e8bcd9′]