राधाकृष्ण विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज धोक्यात ? कार्यकर्त्यांचा जीव ‘खाली-वर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 4 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी आज करण्यात येत आहे. त्यातच भाजपाचे शिर्डी विधानसभेचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा विरोधकांनी केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ज्या वकिलांकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आलं, त्यांचा नोटरी करण्याचा परवाना 2016 मध्येच संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. त्यामुळे विखेंची उमेदवारी बाद झाल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे. तसेच विखेंनी स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे 3 असे एकुण 4 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

visit : Policenama.com