रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट : म्हणाले, ‘त्या’ माजी महिला खासदाराचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करत आहे. त्यात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. विरोधी पक्षातल्या एका माजी महिला खासदारासोबत भेट झाली आहे. जिल्ह्यांध्यक्षांबरोबर बोलून त्यांना लवकरच भाजपमध्ये घेणार आहे, असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना दानवेंनी हे वक्तव्य केले.

पक्षात कुणालाही घ्या. येण्यास बंदी नाही, असं म्हणत दानवेंनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या माजी आमदार, खासदाराजवळ बसलं की त्याला वाटतं कधी आपल्याला भाजपमध्ये घेताय. सध्या कुणीही भाजपमध्ये यायला तयार आहे. एका माजी महिला खासदाराला भेटलो आणि अंदाज घेतला. आता जिल्हा अध्यक्षाशी बोलतो आणि पक्षात घेतो, असं दानवे यांनी म्हटलं. त्यामुळे आता या महिला नेत्या कोणत्या आहेत, यावर सर्वांची चर्चा रंगली आहे.

गौप्यस्फोट करताना दानवेंनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला. काँग्रेसला आता अध्यक्ष मिळत नाही. काँग्रेसची स्थिती सध्या वाईट आहे. भाजपला मात्र अच्छे दिन आले आहेत. हे फक्त मोदींची लोकप्रियता, अमित शहा यांची रणनीती आणि कार्यकर्त्यांचे कष्ट यामुळे हे शक्य झालं, असं त्यांनी यावेळी म्हटलं. तर काँग्रेसचे नेते रणांगण सोडून पळू लागले. चांगले दिवस असताना घरातला अध्यक्ष आणि वाईट दिवस असताना कुणी पण अध्यक्ष करायला तयार होतात, असं म्हणत दानवेंनी राहुल गांधींवरही टीका केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आलेल्या विजयावरही त्यांनी भाष्य केले. या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी मतदारसंघात गेलो नाही. बूथ वर गेलो नाही. फक्त मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती. पण त्यासभेत मी आजारी असल्यामुळे हजर नव्हतो. तरीही लोकांनी मला साडे तीन लाख मतांनी निवडून आणले. कारण मी काम केले आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आरोग्यविषयक वृत्त

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी