BJP MLA | रिसॉर्टवर जुगार खेळताना भाजप आमदारासह 13 जणांना रंगेहाथ पकडले; 7 तरुणींचा समावेश, दारूच्या बाटल्या आढळल्या    

पंचमहाल (Panchmahal ) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – गुजरातमधील (Gujarat) पावागड (Pavagad) शहरालगत असलेल्या रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकून जुगार (Gambling) खेळणाऱ्या एका भाजप आमदारांसह 13 जणांना अटक केली आहे. पंचमहाल पोलिसांनी (Panchmahal Police) गुरुवारी रात्री कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये 7 महिलांचाही समावेश आहे. केसरी सिंह सोलंकी ( Kesari Singh Solanki) असं या भाजप आमदारांचे (BJP MPA) नाव आहे ते खेडा जिल्ह्याच्या मटर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार (BJP MLA) आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्यांवर अवैधरित्या जुगार (Gambling illegally) खेळणं, कोरोनाचं नियम (Corona rules) न पाळणं आणि दारू बाळगणे अशा विविध कलमांतर्गत कारवाई केली आहे.

कोरोनामुळे (Corona) अनेक ठिकाणी निर्बंध लावले आहेत, मात्र तरीही काही जणांकडून त्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. पावागड (Pavagad) शहरालगत असलेल्या एका रिसॉर्टवर जुगार (Gambling) खेळला जात असल्याची माहिती  पंचमहाल पोलिसांना (Panchmahal Police) मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आमदार सोलंकी यांच्यासह २५ जण मद्यधुंद अवस्थेत जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्या आणि कसीनोचं सामान जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) निरीक्षक राजदीपसिंग जडेजा (Inspector Rajdeep Singh Jadeja) यांनी सांगितले. या सर्वाना अटक केली असून त्यामध्ये ७ महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हा रिसॉर्ट आमदाराचाच असल्याचेही तपासात समोर आले आहे. दरम्यान,गुजरात विधानसभा निवडणुकां (Gujarat Assembly Election) जवळ आल्या आहेत त्यातच पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे भाजपची अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु; चार दहशतवादी निशाण्यावर

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  bjp mla arrested in gambling and liquor with 13 others peoples in gujrat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update