भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

भाजप खासदार नाना पाटोळे यांच्या राजीनाम्यानंतर आता नाराज भाजप आमदार डॉ आशिष देशमुख यांनी देखील राजीनामा दिला आहे. ते नागपूरमधील काटोलचे आमदार आहेत. आशिष देशमुख यांनी आज ई-मेल आणि फॅक्सने मुंबईला राजीनामा पाठवला असून उद्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना प्रत्यक्षात राजीनामा सोपवणार आहेत. यापूर्वी देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीकरिता मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहिले होते. तसेच जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर आमदार पदाचा राजीनामा देणार असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0cedcd89-c629-11e8-be7d-7f43dec97cd7′]

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आशिष देशमुख आज वर्ध्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून आज वर्ध्यात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीच्या बैठक आहे. तसंच काँग्रेसच्या वतीने आज वर्ध्यात जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे.

“मी 2 ऑक्टोबर 2018 पासून विधानसभेतील माझ्या आमदारकीचा राजीनामा देत आहे,” असं आशिष देशमुख यांनी हरिभाऊ बागडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

[amazon_link asins=’B019XSHB7O,B019FGRA2U’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37f5ed91-c62a-11e8-ab99-f981b7e88680′]

…तर राजीनामा देईन : देशमुख

आशिष देशमुख यांनी 6 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि त्याविषयीची गरज या सात पानांच्या पत्रात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. शिवाय, वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी राजीनाम्याचाही इशारा दिला होता. भाजप खासदार नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता आशिष देशमुखही बंडाच्या पावित्र्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

अजित पवारांसोबत विधानसभेत एन्ट्री

आशिष देशमुख यांनी डिसेंबर 2017 मध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला दांडी मारुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत विधानसभेत एन्ट्री केली. नागपुरात हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत एन्ट्री केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

कोण आहेत आशिष देशमुख?

आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. उच्चशिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी ‘ग्रामविकासाचा पासवर्ड’ पुस्तकही लिहिले आहे.

[amazon_link asins=’B0748NPV86,B016115VXW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4b65f82e-c62a-11e8-9485-2b2db4533b1c’]

जाहिरात