BJP MLA Ashish Shelar | ‘नवाब मलिक, दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण, याकूबची कबर सजवली आता…’ आशिष शेलारांचे मविआवर टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MLA Ashish Shelar  | काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (Mumbai Police Control Room) फोन करुन 1993 प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी नबी खान उर्फ के.जी.एन. लाला (Nabi Khan alias K.G.N. Lala) याला अटक (Arrest) केली. यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) निशाणा साधला आहे. तसेच मुंबईचे तथाकथित रक्षणकर्ते आता तरी निषेध करणार का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे नाव न घेता विचारला आहे.

अशा समाजकंटकांना बळ कसे मिळते?

आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी एका मागोमाग तीन ट्विट करुन महाविकीस आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. 1993 मध्ये जसे बॉम्बस्फोट झाले, त्याप्रमाणे दोन महिन्यानंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होईल आणि त्यानंतर जातीय दंगली होतील, असा कॉल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नबी खान उर्फ के.जी.एन. लाला याला अटक केली आहे. तसेच 1993 च्या बॉम्बस्फोटातील काही आरोपी लालाच्या परिचयाचे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अशा घातक समाजकंटकांना बळ कसे मिळते?असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.

Advt.

याकूबची कबर सजवली…

नवाब मलिक (Nawab Malik)-दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण दिले. याकूबची कबर (Yakub Memon Grave) सजवली. मुंबईचे तथाकथित रक्षणकर्ते याचा तरी निषेध करणार का? राजकीय स्वार्थासाठी लांगुलचालनाच्या राजकारणाचे घातक पट कोण रचतेय? आम्ही ‘जागर मुंबई’ मधून हेच मुंबईकरांसमोर उघड करतोय, आम्ही स्वार्थासांठी ‘मशाल’ पेटवलेली नाही आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय, असेही ते म्हणाले.

Web Title :-  BJP MLA Ashish Shelar | ashish shelar criticized mahavikas aghadi including shivsena after mumbai blast threatening call

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Farhan Akhtar – Shraddha Kapoor | घटस्फोटानंतर अभिनेता फरहान अख्तर होता ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात; ‘हे’ ठरलं ब्रेकअपच कारण

Vaani Kapoor | पुन्हा एकदा वाणी कपूरच्या बोल्ड अवताराने वाढवले सोशल मीडियाचे तापमान