BJP MLA Ashish Shelar | ‘आजही शेठजी उद्धव ठाकरेंचं लक्ष ठेकेदारांचे पैसे परत देण्यावर’, आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांनी बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला होता. यावरून मुंबई महापालिकेचे (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) हजारो कोटींच्या ठेवी या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ठेवता आल्याचे प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिले. दरम्यान, यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांचा ‘शेठजी’ असा उल्लेख करत टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली आहे, असे म्हणत आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला.
शेठजी उद्धव ठाकरे लक्ष…
आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली. मी शेठजी यासाठी म्हणतो, की त्यांनी धनडांगग्या शेठजींसाठी कामं केली. त्यांनी बिल्डर (Builder), ठेकेदार (Contractor), डिस्को (Disco), पब (Pub), बार (Bar) या सर्वांना त्यांनी सुट दिली. मनपाच्या ठेवीबाबत बोलताना तेच म्हणाले की, हे ठेकेदारांचे पैसे आहेत. आजही ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेल्या दरोड्यापासून मुंबई वाचवणं महत्त्वाचं असल्याची टीका शेलार यांनी केली.
उद्धव ठाकरे अपयशी नेता
मला उद्धव ठाकरे यांच्यावर व्यक्तीगत टीका करायची नव्हती.
परंतु त्यांनी आमचे बापजादे काढले म्हणून मला बोलावं लागत आहे. उद्धव ठाकरे एक अपयशी नेता आहेत.
उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू त्यांच्यापासून दूर गेले. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी देखील त्यांना नाकारलं.
त्यामुळे कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर ते अपयशी ठरले आहेत. अशा अपयशी व्यक्तीच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, याचा विचार केला पाहिजे असेही आशिष शेलार म्हणाले.
Web Title :- BJP MLA Ashish Shelar | ashish shelar criticized uddhav thackeray on bmc fd issue
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ratnagiri Crime | दुर्दैवी! दुचाकीवरून पडून महिला शिक्षिकेचा मृत्यू
Satara Crime News | सातार्यात व्यावसायिकाची ६ गोळ्या झाडून हत्या