BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात’ – आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MLA Ashish Shelar | वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेवर भाजप नेते (BJP) आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी तीव्र संताप व्यक्त करत मुंबई पालिकेतील (Mumbai Municipal Corporation) सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) म्हणाले, ‘नागरिक, संपादक, पत्रकार बोलले तर त्यांना घरात घुसून, मारले जाते, गुन्हे दाखल केले जातात, आमदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थितीत केले तर त्यांना निलंबित केले जाते. मंत्रीच महिलांवर अत्याचार करतात, पोलिसांना वसूली करायला लावली जाते, आता मुंबईकरांनी निवडून दिलेल्या नगरसेविकांना असभ्य बोलले जाते त्यांना मारण्यासाठी गुंडे बोलवले जातात महाराष्ट्रात गब्बर चे राज्य आहे काय? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. तसेच, मुंबई महापालिकेत घडलेल्या घटनेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केलीय.

‘अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जात असेल आणि तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर 72  तासांनी महापौर रुग्णालयात पोहचल्या. 72 तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. मुंबई पालिकेचा (Mumbai Municipal Corporation) मुंबईकरांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचं ते म्हणाले. तर, घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुंबईच्या महापौर किंवा पालिकेतील एकही अधिकारी किंवा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव त्या ठिकाणी पोहचले नाही. मात्र, त्यांच्या आधी भाजप नेत्यांचा गट तिथे पोहचला आणि त्यामुळे मुंबई पालिकेच्या रुग्णालयात सुरू असलेला हा हलगर्जीपणा सर्वांसमोर आला. त्याचा निषेध म्हणून आरोग्य समितीच्या भाजपा सदस्यांनी राजीनामा दिला.

 

दरम्यान, ‘सभागृहात याबाबत जाब विचारला तर त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी सभागृहात असभ्य भाषा वापरली,
गळा दाबून टाकू, गळा चिरुन टाकू पर्यंतची दमदाटी ते करु लागले. त्याबद्दल सवाल केला तर यशवंत जाधव यांनी भायखळ्यातील गुंड सभागृहाबाहेर बोलावले.
त्यांनी भाजपा नगरसेविकांना (BJP corporator) धक्काबुक्की केली. मुंबईकरांनी निवडून दिलेल्या नगरसेविकांसोबत असे वागणार?
गुंडाकडून धक्काबुक्की करणार? गब्बर सिंगचे राज्य आहे काय? असा सवाल आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी उपस्थित केला आहे.
तर, या सगळ्या घटनेचे चित्रण आमच्याकडे आहे त्यामुळे त्याची चौकशी करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

 

 

Web Title :- BJP MLA Ashish Shelar | bjp leader and MLA ashish shelar slams thackeray government over so many issues

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम दामदुप्पट करण्याच्या आमिषाने 34 लाखांची फसवणूक ! निलम केवट, प्रमोद चव्हाण आणि सचिन चव्हाण यांच्यावर FIR

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Omicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…