BJP MLA Ashish Shelar | … म्हणूनच रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके, संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis) यांनी नागपुरात रेशीम बागेतील (Reshim Bagh) संघ कार्यालयाला भेट दिली. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी, खाकी पॅन्ट घालून सभागृहात येतील अशी टीका राऊतांनी केली होती. त्यांच्या टीकेला भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री रेशीमबागेत गेले त्याचा त्रास संजय राऊतांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली, असा घणाघात आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी केला आहे.
आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी ट्विट करत संजय राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. शेलार म्हणाले, मुख्यमंत्री रेशीमबागेत गेले त्याचा त्रास संजय राऊत यांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली. काँग्रेस (Congress), नवाब मलिक (Nawab Malik), असलम शेख (Aslam Sheikh) यांची संगत आणि याकूबच्या थडग्यावर (Yakub Memon Grave) रोषणाई करणाऱ्यांना असा त्रास, मळमळ, जळजळ होणारच! असं ट्विट त्यांनी केलं आहे.
हिंदूना सडके म्हणणारा सर्जिल उन्मानी तुम्हाला प्रिय…
दाऊद बरोबर व्यवहार करणारे तुमचे लाडके…
म्हणूनच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाव ठेवणारे, रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके!!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 29, 2022
याशिवाय हिंदूंना सडके म्हणणारा सर्जील उस्मानी (Sergil Usmani) तुम्हाला प्रिय, दाऊद बरोबर व्यवहार करणारे तुमचे लाडके, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) नाव ठेवणारे, रेशीम बागेवर टिप्पणी करणारे तुमचे डोके सडके!! अशा शब्दात आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
मा. मुख्यमंत्री रेशीम बागेत गेले त्याचा त्रास श्रीमान संजय राऊत यांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली.
काँग्रेस, नवाब मलिक, अस्सलम शेख यांची संगत आणि याकूबच्या थडग्यावर रोषणाई करणाऱ्यांना असा त्रास, मळमळ, जळजळ होणारच!
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 29, 2022
काय म्हणाले होते संजय राऊत?
रेशीमबागला जाणे चुकीचं नाही, हिंदुत्त्ववादी विचारांची संघटना आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोड्यानं
जात असलतील तर आनंद आहे. काही दिवसांनी ते सभागृहात खाकी पॅन्ट घालून आले तरी मी त्यांचं स्वागत करेन,
असा खोचक टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला होता.
Web Title :- BJP MLA Ashish Shelar | bjp leader ashish shelar criticizes shivsena mp sanjay raut
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Sanjay Raut | शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार? संजय राऊत म्हणाले -‘एक बाप असेल तर…’
Election Commission Of India | मतदान प्रक्रियेत होणार मोठा बदल; आता देशात कुठेही करता येणार मतदान