BJP MLA Ashish Shelar | CM एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात आशिष शेलार यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांभाळलेल्या राज्याच्या नगर विकास मंत्रालयाविरोधात (Ministry of Urban Development) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. ही याचिका एकनाथ शिंदे नगरविकासमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाविरोधात आहे. या याचिकेत तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाने मुंबईतील वांद्रे येथील एका ट्रस्टच्या जमिनीच्या (Land) आरक्षणासंदर्भात (Reservation) घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. याशिवाय नागरी सुविधांसाठी राखीव असणारी जागा खासगी फायद्यासाठी वापरली जात असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी केला आहे.

 

भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी नगरविकास खात्याच्या 12 मार्च 2021 च्या एका नोटिफिकेशनला (Notification) आव्हान दिले आहे. वांद्रे येथील बाई अवाबाई फ्रमजी अनाथाश्रमाच्या (Bai Avabai Framji Anatha Ashram) जमिनीवरील आरक्षण खासगी फायद्यासाठी बदलले, असा आरोप शेलार यांनी याचिकेत केला आहे. या जमिनीवर पालिका बाजारपेठ, वृद्धाश्रम, वसतिगृह, मैदान, बगीचा यासाठी ही जागा राखीव ठेवण्यात आली होती. परंतु नगरविकास खात्याने नोटिफिकेशन जारी करुन हे आरक्षण हटवलं आहे.

 

बाई हमाबाई फ्रमजी पेटिट (Bai Hamabai Framji Petit) यांनी आपले दागिने विकून आईच्या आठवणीत पारसी मुलांसाठी अनाथाश्रम सुरु केला होता.
त्यांनी दान केलेल्या जमिनीवर 1913 मध्ये बाई अवाबाई फ्रमजी पेटिट माध्यमिक शाळा (Bai Awabai Framji Petit Secondary School) सुरु करण्यात आली.
त्यांनी दान केलेल्या 2.2 एकर जमीनीवर 1991 च्या विकास आराखड्यात विविध सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षण ठेवले होते.
मात्र, आता या आरक्षणात बदल केल्याचा आरोप शेलार यांनी केला.

आशिष शेलार यांनी ही याचिका फेब्रुवारी 2022 मध्ये दाखल केली.
शुक्रवारी (दि.1) ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती समोर आली. परंतु वेळेअभावी या याचिकेवर सुनावणी झाली नाही.

 

Web Title :- BJP MLA Ashish Shelar | bjp mla ashish shelar files pil against urban development dept formerly headed by eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jyotiraditya Scindia | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे…’

 

Pune Crime | भर रस्त्यात महिलेने स्वत:चा टॉप फाडून केली महिला पोलिसांना मारहाण; वडगावशेरी परिसरातील घटना

 

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम