BJP MLA Atul Bhatkhalkar | मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रँडचे फटाके…, अतुल भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत ठाकरेंच्या दौऱ्यावर भाष्य केले आहे. मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रँडचे फटाके, अ‌ॅपटीबार, घरबॉम्ब, सुससुरी असे ट्वीट अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) म्हणाले.

 

अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीटमध्ये फटाक्याचा खोका आणि उद्धव ठाकरेंचा फोटो टाकला आहे. मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रँडचे फटाके, अ‌ॅपटीबार… घरबॉम्ब… सुससुरी…, असे म्हंटले आहे. शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी देखील ठाकरेंच्या दौऱ्यावर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी केवळ पंधरा मिनिटांचा दौरा केला, असे शिरसाट म्हणाले. एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन चहा घेण्यासाठी सुद्धा वीस मिनिटे लागतात. पण ठाकरेंनी केवळ पंधरा मिनिटांत दौरा उरकला. त्यामुळे हे मोठे आश्चर्य आहे. ते औरंगाबादमध्ये आले, त्यांचे आम्ही स्वागत करतो. पण ते दिलासा न देताच निघून गेले. त्यांच्यामुळेच ही वेळ आली आहे. त्यांनी वेळेत आम्हाला दिलासा दिला असता, तर एवढे सगळे रामायण घडलेच नसते, असे देखील शिरसाट म्हणाले.

परतीच्या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचा कापणीला आलेला आणि कापून ठेवलेला सर्व शेतमाल पावसाने वाया घालविला. त्यामुळे शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला आहे. पावसामुळे या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद दौरा काढला आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
तसेच ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी देखील केली आहे.
शेतकऱ्यांसोबत संवाद साधत ठाकरे म्हणाले, या निर्दयी सरकारकडे केवळ भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी आहे.
आसूड फक्त हातात ठेवू नका, तो वापारा. सरकारला पाझर फुटत नसेल, तर घाम फोडा.
आमच्यासोबत गद्दारी केली, शेतकऱ्यांसोबत करु नका.

 

Web Title :- BJP MLA Atul Bhatkhalkar | bjp atul bhatkhalkar criticized
shivsena uddhav thackeray over aurangabad visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा