भाजप नेते अतुल भातखळकरांची बोचरी टीका, म्हणाले – ‘नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुका (Assembly elections) स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यातच शनिवारी (दि. 12) पटोले यांनी अकोल्यात थेट मुख्यमंत्री (CM) होण्याची इच्छा बोलून दाखवली. पटोले यांच्या या विधानावर भाजपने (BJP) आता जोरदार हल्लाबोल केला आहे. नाना पाटोलेंना मुख्यमंत्री व्हावस वाटतंय. राहुलजींनाही पंतप्रधान व्हावस वाटतंय. मात्र जनतेला असे अजिबातच वाटत नाही अन् भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे, असे ट्वीट करत भाजप आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी पटोले आणि काँग्रेसला टोला लगावला आहे.

 

नाना पटोले (Nana Patole) हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात अकोला इथे एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमधून गौरवलेल्या अकोल्याचे मुरलीधर राऊत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पटोले यांनी राज्यात काँग्रेसला बळकट करण्याविषयी भाष्य केले होते. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर पटोलेंना Nana Patole विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मात्र त्यानंतर त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. प्रदेशाध्य़क्षपद झाल्यापासून पटोले विरोधकांसह मित्रपक्षांबाबतही आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गजांना अंगावर घेणारे पटोले आगामी काळात काँग्रेसला खरच राजकीय (Political) यश मिळवून देतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Wab Title :- bjp mla atul bhatkhalkar slams congress leader rahul gandhi and nana patole

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा