बलात्कार प्रकरणात भाजपा आमदारावर आरोप निश्चिती

पणजी : वृत्तसंस्था – गोव्यातील पणजीचे भाजपा आमदार अतानासियो मोंसेरेट यांच्यावर १६ वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले.

एका १६ वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा आमदार अतानासियो मोंसेरेट यांच्यावर २०१६ रोजी दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करुन गेल्या वर्षी उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात २५० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

Atanasio Monserrate

त्यानंतर आता उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयात मॉन्सरेट यांच्याविरुद्धच्या खटल्यात आरोप निश्चित केले गेले. ५५ वर्षाचे मॉन्सरेट यांच्याविरुद्ध ३७६ तसेच पॉक्सो कायद्याखाली आरोप निश्चित केले गेले आहेत. या प्रकरणी आता १७ ऑक्टोंबरपासून खटला सुरु होणार आहे.

Visit : policenama.com

Loading...
You might also like