BJP MLA | ज्येष्ठ BJP कार्यकर्त्याच्या घरी आमदाराची टर उडवणारी टिपणी; थेट चंद्रकांत पाटील, मुनगंटीवारांकडे तक्रार

यवतमाळ / पुसद : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा पक्ष आहे. मात्र यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पुसद येथे भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर दिसून येत आहे. यामुळे हे चित्र वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढवणारे आहे असे दिसते. पुसद मधील नव्या-जुन्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील गटबाजी आणि बेशिस्तीचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील जुन्या ज्येष्ठ BJP कार्यकर्त्याच्या घरी झालेल्या बैठकी दरम्यान, भाजप आमदाराची (BJP MLA) काही टर उडवणारी टिपणी उडविल्याने त्या संतापलेल्या आमदारांनी (MLA) नगरसेवकाला चांगलंच फटकारलं आहे. विशेष ही गोष्ट आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्याकडे आली आहे.

BJP MLA | dispute between mla and corporator in pusad of yavatmal

विशेष म्हणजे, आगामी काळात नगरपालिकेचा निवडणुकीचा धुमाकूळ आहे. याच्या तयारीसाठी भाजप, किसान आघाडी यांचे पदाधिकारी असलेल्या जुन्या कार्यकर्त्याच्या घरी भाजप (BJP) कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी भाजप नगरसेवक, जुने पदाधिकारी याचबरोबर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नातेवाईक असल्याचे म्हणणाऱ्या नगरसेवकाने आमदार (MLA) यांच्याबाबत टर उडविणारी टिप्पणी केकेली. त्यावेळी आमदार चांगलेच संतापले. तेव्हा काही जुन्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली. दरम्यान आमदारांनी नगरसेवकांसह तीनही ज्येष्ठ कार्यकर्त्यांना चांगलेच फटकारले आणि बैठकीतून रजा घेतले. या दरम्यान, पक्षात प्रवेश करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांना जुने कार्यकर्ते सन्मानजनक वागणूक देत नसल्याने भाजपमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, ‘या बैठकीचे पडसाद संध्याकाळी देखील चर्चेत आले. त्यावेळी नगरसेवक आमदाराबाबत
माघारी बोलले. याबाबत व्हिडिओ आमदारापर्यंत पोहचले. दरम्यान, नगरसेवकाने आमदार मदन
येरावार (MLA Madan Yerawar) यांच्याकडे आपल्याच पक्षातील आमदाराबाबत तक्रार केली
आहे. याववरुन त्यांनी पुसदला आमदारांना फोन केला. म्हणून तेथील आमदार पुन्हा संतापले आणि थेट त्यांनी भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्याशी संपर्क साधून या नगरसेवकाला आवरा, अशा शब्दात तक्रार केली आहे. तर, मुख्यतः म्हणजे या नगरसेवकाने आपल्या प्रभागासाठी मुनगंटीवार यांच्या साहाय्याने अडीच कोटी रुपयांचा निधी आणल्याने भाजप (BJP) कार्यकर्त्यात चर्चा होती. या जुन्या आणि नव्या वादामुळे वरिष्ठांची चिंता वाढल्याचे चित्र दिसत आहे.

हे देखील वाचा

Film Producer Vibhu Agrwal | चित्रपट निर्माता विभू अग्रवालवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, मुंबई पोलिसांनी केली अटक

Khel Ratna Award |….म्हणून बदललं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव; PM मोदींनी सांगितलं ‘हे’ कारण

Manisha Kayande | ‘अमृता फडणवीसांना सध्या कोणतेही काम नाही, BJP ने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  BJP MLA | dispute between mla and corporator in pusad of yavatmal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update