BJP MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईक यांना हायकोर्टकडून दिलासा ! धमकावणे, बलात्कार प्रकरणी न्यायालय म्हणाले…

मुंबई : BJP MLA Ganesh Naik | महिलेला रिव्हाॅल्वरचा धाक धाकवून धमकावणे आणि बलात्कार अशा दोन स्वतंत्र दोन गुन्ह्यात अडकलेले भाजप आमदार गणेश नाईक यांना मुंबई हायकोर्टाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईतील दोन पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांबाबतचे खटले तीन महिन्यांतच निकाली काढण्याचे निर्देश सुद्धा हायकोर्टाने दंडाधिकारी कोर्टाला यावेळी दिले त्यामुळे आमदार नाईक यांच्यावरील या गुन्ह्यांबाबत कोर्ट नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या तक्रारी निव्वळ राजकीय वैमनस्यातून दाखल झाल्याचा दावा नाईक यांच्यावतीने जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी हायकोर्टात केला आहे. (BJP MLA Ganesh Naik)

भाजप नेते गणेश नाईक यांची बाजू मांडणारे जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडत सदर प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच ‘ए समरी’ रिपोर्ट दाखल केल्यानं आता या प्रकरणात काहीही उरलेलं नाही, त्यामुळे या तक्रारी निव्वळ राजकीय वैमनस्यातून दाखल करण्यात आल्या असल्याचा दावा नाईक यांनी यावेळी केला. दरम्यान याची नोंद घेत घेत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर गणेश नाईकांनी गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. (BJP MLA Ganesh Naik)

नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक यांच्या परिचिच असणाऱ्या एका महिलेने बलात्कार आणि रिव्हाॅल्वरच्या धाकाने धमकावल्याची तक्रार नोंदवली होती, परंतु या प्रकरणी कोर्टाकडून नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. याचे कारणही अगदी तसेच होते. तक्रारदार महिला आणि गणेश नाईक 1995 ते 2017 पर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, त्यामुळे प्रथमदर्शनी याला बलात्कार म्हणणे चुकीचे ठरेल असे निरीक्षण हायकोर्टाकडून नोंदवण्यात आले होते आणि याच कारणास्वत नाईक यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

तक्रार दाखल करणारी महिला आणि भाजप आमदार गणेश नाईक हे 1995 ते 2017 सालापर्यंत म्हणजेच साधारण 27 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या संबंधातून त्यांना एक मुलगा जन्माला आला, जो आता १५ वर्षांचा आहे. दरम्यान आपल्या मुलाला नाईक यांना वडिल म्हणून नाव द्यावे अशी मागणी सदर महिलेने केली असता गणेश नाईक यांनी ती सपशेल फेळाटून लावली. त्यामुळे त्या महिलेने राजकीय विरोधकांच्या मदतीने पोलिस ठाणे गाठत नाईक यांच्या विराधात रीतसर तक्रार दाखल केली. गणेश नाईक यांनी आपल्याला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावलं तसेच सतत बलात्कार केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला, त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी सीबीडी बेलापूर आणि नेरूळ येथे हे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.

दरम्यान आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्या तक्रारदार महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडेही तक्रार
दाखल केली. या संपुर्ण पार्श्वभूमीवर अटक होण्याच्या भीतीपोटी गणेश नाईक यांनी यांनी ठाणे सत्र न्यायालयात
अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता परंतु ठाणे न्यायालयाने अर्ज सपशेल फेटाळून लावत त्यांना
दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे नाईक यांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि
अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आणि न्यायालयाने तो मंजूर देखील केला.

Web Title :- BJP MLA Ganesh Naik | bjp mla ganesh naik disposed of rape and intimidation case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | प्रेमात खर्चलेल्या पैशांची मागणी करत तरुणीवर बलात्कार; भोसरी परिसरातील घटना

Udayanraje Bhosale | उदयनराजे भाजप सोडणार? उद्या निर्णय घेणार