BJP MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक ? जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MLA Ganesh Naik | भाजप नेते आणि ऐरोलीचे (Airoli) आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) गणेश नाईकांवर बलात्काराचा (Rape Case On Airoli BJP MLA Ganesh Naik) गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे. बलात्कार प्रकरणात (Rape Case) नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये (Nerul Police Station) गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेतला जात आहे.

 

गणेश नाईक यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
कोपरखैरणेमधलं (Kopar Khairane) घर, कार्यालय आणि मुरबाडमधल्या (Murbad) फार्महाऊसवर पोलिसांचं पथक गणेश नाईकांचा शोध घेत आहे.
दुसरीकडे गणेश नाईक यांच्या अटकेसाठी राजकीय पक्ष आंदोलने करत आहेत.
नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) महिला नेत्यांनी आंदोलन केलं आहे.

 

काय आहे प्रकरण ?
पीडित महिला 1993 मध्ये वाशी (Vashi) सेक्टर – १७ मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब (Big Flash Sports Club) येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या.
यावेळी नाईक हे अनेकवेळा बैठकीसाठी येत असायचे. त्यानंतर ओळख झाल्यावर अनेकवेळा त्यांनी मला संपर्क केला.
1995 मध्ये आमच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.
त्यावेळी नाईक यांनी पारसिक हिल (Parsik Hill) येथील बंगल्यात नेत शरीरसंबंध (Sexual Intercourse) प्रस्थापित केले.
त्यानंतर आम्ही पुण्यात (Pune) फिरायला गेलो होतो तेव्हाही आमच्यात दोघांच्या सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

नोव्हेंबर 2006 मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर सहाव्या महिन्यात एप्रिल 2007 मध्ये त्यांच्या सांगण्यावरून मी न्यू जर्सी (New Jersey) येथे राहण्यास गेले.
18 ऑगस्ट 2007 मध्ये मी मुलाला जन्म दिला. त्यानंतर मुलगा दोन महिन्यांचा असताना नाईक त्याला घेण्यासाठी स्वत: अमेरिकेला आले होते.
तिथून परतल्यानंतर आम्हाला नेरूळमधील सीब्रीज टॉवर (Sea Breeze Tower) इमारतीत राहायला सांगितलं.
नाईक आठवड्यातून तीन वेळा घरी यायचे आणि त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत लैंगिक शोषण (Sexual Abuse) केलं असल्याचं संबंधित पीडितेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

 

Web Title :- BJP MLA Ganesh Naik | navi mumbai police team to search for airoli bjp mla ganesh naik after rape case was registered


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा