BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Gopichand Padalkar | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द झाल्यामुळे भाजप (BJP) आक्रमक होत सरकारवर टीका करीत आहे. सत्ताधारी आणि विरोधक परस्पर टीकाटिपणी करताना दिसत आहे. अशातच आता भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेत्यांवर निशाणा साधला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

‘ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत आणि ओबीसी नेत्याचे माकड झाले आहे’ अशी घणाघाती टीका पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलीय. त्यावेळी त्यांनी सांगलीत माध्यमांशी सवांद साधला.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, ‘ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्र्याच्या शब्दांला कवडीची किंमत राहिली नाही’ अशी घणाघाती टीका केलीय, तर, ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) तसेच ओबीसी समाजाला दगाफटका करणाऱ्या महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चोख उत्तर देत आहेत. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या निवडणुकामध्ये सर्व जागेवर ओबीसीचे उमेदवार उभे केले जातील असे जाहीर केले आहे. फडणवीस यांचे आभारी आहे. त्याच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज राहील, असे म्हणत फडणवीसांवर पडळकर (Gopichand Padalkar) यांनी स्तुतीसुमने उधळली.

पुढे पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, ‘ओबीसी नेते मलिदा खाण्यासाठी सत्तेमध्ये आहेत का? ‘त्यांनी आत्मसन्मान विकला आहे का? अशा सर्व सवालावर महाराष्ट्रामधील ओबीसी समाज जागृत झालाय. येत्या 26 तारखेला ओबीसी समाज आपली ताकत दाखवत या सरकारला जागा दाखवणार असल्याचं त्यांनी म्हटलं, तसेच, ‘जो पर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण (OBC reservation) पुन्हा प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार नाहीत. अशी भीम गर्जना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या निवडणूक जाहीर झाल्या. या ओबीसी नेत्याच्या शब्दाला मातीमोल किंमत या आघाडी सरकारने केली आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचं देखील गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी म्हटलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : bjp mla gopichand padalkar criticizes thackeray government’s obc ministers and leaders over obc reservation

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी