BJP MLA Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची पवार कुटुंबावर घणाघाती टीका, म्हणाले-‘पवार कुटुंबीयांचा खरा चेहरा पाहायचा असेल तर…’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांच्या ग्रीन एकर कंपनीची (Green Acre Company) ईडीकडून चौकशी (ED Investigation) करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांच्या रेशनकार्डवरील सर्व व्यक्तींची एकदा चौकशी करा, तरच त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी शरद पवार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

 

संपूर्ण पवार कुटुंबाच्या रेशनकार्डवरील (Ration Card) व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे. रेशनकार्डवर जेवढी नावे आहेत त्यांची डिटेल मध्ये चौकशी करावी. संपूर्ण चौकशीनंतरच पवार कुटुंबाचा (Pawar Family) खरा चेहरा जनतेसमोर येईल. शरद पवार हे संविधानापेक्षा (Constitution) मोठे नसून आयकर विभाग (Income Tax Department), ईडी अशा एजन्सींनी देखील सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याची मागणी गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केली.

 

यावेळी त्यांनी शिवसेनेवर (Shivsena) देखील जोरदार टीका केली. ज्यांना लोकांमध्ये कहीही किंमत नाही, जनाधार नाही, अशा लोकांसोबत ते युती करत असून यावरुन शिवसेना किती खोलात गेली आहे हे समोर आले आहे. पण अशा कोणत्याही टेकूने आता शिवसेना वर येणार नसल्याचे सांगत संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) सोबत युती केल्याने पडळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला.

तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचारधारेपासून खूप मोठी फारकत घेतली आहे.
आता त्यांना परत ट्रॅकवर येणे खूप अवघड आहे.
ज्या लोकांनी हिदुत्वाला (Hindutva) विरोध केला,
ज्या लोकांनी समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न केला
अशा लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे समाजाला काय मेसेज देणार? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- BJP MLA Gopichand Padalkar | gopichand padalkar criticize pawar family

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा