भाजपा आमदाराची पोलिस ठाण्यात गुंडगिरी, युवतीची छेड काढणार्‍याला नेलं सोडवून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील मोहमद्दी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपा आमदार लोकेंद्र बहादूर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह गोंधळ घातला. थेट पोलीस ठाण्यात घूसून गुंडगिरी करणा-या आमदारांनी तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडेलल्या एका आरोपीला आपल्या सोबत सोडवून नेले.

या प्रकाराचा व्हिडीयो सोशिल मिडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरामुळे आमदार बाहदूर यांने योगी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. मोहमद्दी कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीसांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार बहादूर संतप्त झाले. आपल्या शेकडो कार्य़कर्त्यासह त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर रात्रभर त्यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात गोंधळ घातला.

दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत गैरवर्तन केेले. आमदार बहादूर यांची दंबगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसापूर्वी बहादूर यांनी धान्य खरेदी केंद्रात जाऊन गोंधळ घातला होता. तसेच तेथील कर्मचा-यांना शिवीगाळही केली होती.