BJP MLA Madhuri Misal | बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खून खटल्यासंदर्भात भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  BJP MLA Madhuri Misal | बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खूनाच्या (Bibvewadi Girl Murder Case) प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात (fast track court) चालवावा आणि या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (adv ujjwal nikam) यांची नियुक्ती करावी अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ (BJP MLA Madhuri Misal) यांनी केली आहे.

 

मिसाळ म्हणाल्या, ‘गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे.
वळसे-पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्याकडे निवेदन दिले आहे.
पोलीस आयुक्तालयामार्फत लवकरच राज्य शासनाकडे याविषयीचा प्रस्ताव पाठवला जाईल.’

 

क्षितिजा व्यवहारे (Kshitija Anant Vyavahare) या आठवीत शिकणार्‍या चौदा वर्षे वयाच्या मुलीचा एक तरुण आणि त्याच्या साथीदारांनी बिबवेवाडीतील यश लॉन्स
(yash lawns pune) परिसरामध्ये धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून (Murder) १२ ऑक्‍टोबरला संध्याकाळी खून केला होता. ती कबड्डी खेळाडू होती.
यश लॉन्स परिसरात ती कबड्डीचा सराव करीत होती. या गंभीर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

 

अनेक गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असतो. खरं तर अशाप्रकारचे गुन्हे करण्यासाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अल्पवयीन मुलांचा गैरवापर करीत असतात.
कायद्यातील तरतुदींमुळे ही मुले निर्दोष सुटतात. त्यामुळे कायद्यात बदल करणे आवश्यक वाटते.
विधिमंडळात आणि कायदे तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करून या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा.
अशी ही मागणी मिसाळ (BJP MLA Madhuri Misal) यांनी केली आहे.

 

Web Title : BJP MLA Madhuri Misal | Bibwewadi minor girl’s murder case to be tried in fast track court adv Ujjwal Nikam should be appointed as Public Prosecutor Demand of MLA Madhuri Misal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Hasan Mushrif | हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार? जाणून घ्या कारण

Ajit Pawar On Pune Metro | ‘शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम दिवाळीनंतर सुरू करणार’

7th Pay Commission | ‘या’ अधिकार्‍यांना दिवाळीपूर्वी लागली लॉटरी, पगारात मिळाली 2030 रुपयांची विशेष ‘वाढ’; जाणून घ्या