गुन्हा दाखल होताच आमदार महेश लांडगेंनी मुलीचा विवाह माऊलींच्या ‘साक्षी’ने उरकला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge ) यांच्या मुलीच्या लग्नाच्यापूर्वीच्या मांडव डहाळेच्या कार्यक्रमातील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी महेश लांडगे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी डान्स करताना कोरोनाच्या कोणत्याही नियमाचे पालन केल्याचे दिसून आले नाही. यामुळे महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश लांडगे यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने माऊलींच्या ‘साक्षी’ने उरकला

आमदार महेश लांडगे यांची कन्या साक्षी हीचा विवाह 6 जून रोजी होणार होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार लांडगे यांनी आपल्या मुलीचा विवाह सहा दिवस आधीच अगदी थोडक्यात उरकून टाकला आहे. देवाची आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या काळात एका लोकप्रतिनिधीकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याची चर्चा होऊ लागली. त्यामुळे या चर्चांवर पडदा टाकण्यासाठी आमदारांनी आपल्या कन्येचे लग्न साध्या पद्धतीने लावून दिले.

राज्यात वेगळीच चर्चा रंगल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी असं पाऊल उचलण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 6 जूनला हा विवाहसोहळा होणार होता. पण लॉकडाऊन वाढवल्याने परवानगी मिळणार नाही, हे ही या मागचे करण असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Pune : जमीन खरेदी केल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ; वाकड चौकातील अमित कलाटेला अटक, न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 33 हजार रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 93.88 %

Pune : पुण्यात दुपारी 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी ! उद्याने, मॉल्स, थिएटर, जीम अशी गर्दीची ठिकाणे बंदच राहाणार; जाणून घ्या सविस्तर

बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागणारा शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख गजाआड