भाजपाचे ‘हे’ आमदार ठरले देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर, संपत्तीत 18 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाचे आमदार आणि बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत. त्यांच्या परिवाराची एकूण संपत्ती 31,960 कोटी रुपयांवर पोहोचली असून चालू वर्षात त्यात 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्रोहे हुरुन इंडियातर्फे केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे.

‘ग्रोहे हुरुन’ इंडियातर्फे देशभरातील बांधकाम व्यावसायिकांचा 30 सप्टेंबर अखेरिस असलेल्या संपत्तीचा आढावा घेण्यात आला. ज्यात अव्वल स्थानी मंगल प्रभात लोढा आहेत. लोढा यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 31 हजार 930 कोटी रूपये इतके झाले आहे. त्यानंतर या सूचीमध्ये डीएलएफचे राजीव सिंग (25 हजार 80 कोटी रूपये वार्षिक उत्पन्न) व एम्बॅसी समूहाचे संस्थापक जितेंद्र विरवाणी (24 हजार 750 कोटी रूपये वार्षिक उत्पन्न) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

ग्रोहे हुरुन’ च्या देशरातील 100 सर्वात श्रीमंत बिल्डरांपैकी अव्वल 10 बिल्डरांपैकी 6 बिल्डर मुंबईतील आहेत. या यादीतील 100 पैकी 37 बिल्डर मुंबईत राहत आहेत. बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याचे बोलले जात असताना देखील मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बांधकाम व्यावसायिकांच्या संपत्तीत 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Visit : Policenama.com