‘पाताल लोक’वरून नवा वाद ! भाजप आमदारानं केली ‘विराट-अनुष्का’च्या घटस्फोटाची मागणी ( व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार आणि एक प्रोड्युसर अनुष्का शर्मानं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली. या सीरिजला चाहत्यांपासून तर क्रिटीक्स पर्यंत सर्वजण हिट म्हणत आहे. खास करून स्टोरी आणि अॅक्टींग सर्वांनाच आवडली आहे. असं असतानाही सीरिज आता वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. गोरखा समुदाय आणि उत्तर प्रदेशचे भाजप आमदार यांच्या सीरिजबद्दलच्या तक्रारीनंतर सिक्कीचे लोकसभा खासदार इंद्र हंग सुब्बा यांनी या वेब सीरिजवर आक्षेप घेतल. इंद्र यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहित सीरिजच्या विरोधात अॅक्शन घेण्याची मागणी केली. यानंतर आता नवीनच वाद सुरू झाला आहे. गाझियाबादमधील भाजप आमदार नंदिकिशोर गुर्जर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घटस्फोटाची मागणी केली आहे.

भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी म्हटलं आहे की, या सीरिजमध्ये गुर्जर समुदायाचं चुकीच्या पद्धतीनं चित्रण करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर त्याच्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो गुन्हेगारासोबत वापरून देशद्रोहाचं काम केल्याचा आरोपही त्यांनी अनुष्कावर केला आहे. यानंतर त्यांनी अशी मागणी केली आहे की, विराट कोहलीनं अनुष्काला घटस्फोट द्यावा. त्यांच्या या मागणीनंतर आता एकच खळबळ उडाली आहे.

एका मुलाखतीत बोलताना नंदकिशोर गुर्जर म्हणाले, “देशापेक्षा कोणीही मोठं असू शकत नाही. विराट कोहली आजवर देशासाठी खेळत आला आहे. त्यानं देशाचं नाव मोठं केलं आहे. तो देशभक्त आहे. परंतु अनुष्का मात्र या सीरिजची निर्माती आहे. त्यामुळं तिनं देशद्रोहाचं काम केलं आहे. म्हणूनच आता विराटनं अनुष्काला तातडीनं घटस्फोट द्यावा. ती विराटसोबत रहात आहे. तिनं देशद्रोहाचं काम केलं आहे.” गुर्जर यांचा व्हिडीओदेखील समोर आला आहे जो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like