‘चाकरमान्यांनो, गावाला येऊ नका’, भाजपचे आमदार नीतेश राणेंनी सांगितलं

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – कणकवलीचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई तुन सिंधुदुर्ग-रत्नागिरी कडे निघालेल्या चाकरमान्यांना आवाहन करत,मुंबईतच राहावं असं सांगितलं आहे.’मुंबईतून लोक गावी आल्यामुळे गावामध्ये कोरोना पसरू शकतो,अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने सध्या धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ६३ रुग्ण सापडले असून,मुंबईत हा विषाणू वेगाने पसरत असल्याने लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला व नववी व आकारवीच्या परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने चारकमानी आपापल्या गावाकडं जायला निघाले.मात्र त्यामुळे गावाकडच्या लोकांना चिंतेने ग्रासलं आहे. तीच चिंता नितेश यांनी ट्विट च्या माध्यमातून व्यक्त केली.

‘सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरी कडे निघाले आहेत.या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबई च्या घरी राहावे कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस परसण्याची शक्यता आहे. ही वेळ सुट्टीची नाही. आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्याची आहे’ असं राणे यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे.राज्यामध्ये कालपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२ होती तीच आज ६३ वर गेलीय. यात मुंबई मधील ११ तर पुण्यातील १ जण आहे.याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.