नितेश राणेंनी ‘ठाकरे सरकार’वर टीका करताना केलं ‘वादग्रस्त’ ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रात सत्तास्थापन झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार बनवले आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या आघाडीवर अप्रत्यक्ष टीका करणारा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काय आहे ट्विट
नितेश राणे यांनी एका गाडीला माकडांनी वेढा घातल्याचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोत अनेक माकडं आहेत. त्यातील काही माकडं गाडीचा दरवाजा उघडून चालकाच्या जागी, काही गाडीत तर काही गाडीच्या टपावर बसलेली दिसत आहेत. या फोटोला एक कॅप्शन देण्यात आले आहे. ‘कब्जा तो पूर्ण बहुमत से किया है … लेकिन चलाना एक को भी नहीं आता’ असे कॅप्शन दिले आहे.

महाविकास आघाडी बहुमताच्या परीक्षेत पास
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीनं सत्तास्थापनेचा दावा केला. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. तसेच विश्वासदर्शक ठरावाची चाचणी सभागृहात सुरु असताना भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला. सरकारला 169 आमदारांनी समर्थन दिले, तर 4 आमदार तटस्थ राहिले. त्यामुळं हा ठराव उद्धव ठाकरे सरकारनं 169 विरुद्ध 0 मतांनी जिंकला.

Visit : Policenama.com