‘उद्या इज्जत घालवण्यापेक्षा आजच राजीनामा देऊन टाका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परिवह खात्यात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विरोधकांनी परब यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा आमदार नितेश राणे Rane यांनी कोकणी भाषेत अनिल परबांच्या राजीनाम्याची मागणी केली. राणेंनी ट्विट करून म्हटले आहे की, ओ परबांनू, मंत्री पदाचा राजीनामा आजच देऊन टाका. उगाच उद्या इज्जत जावुक नको. आजच उरलीसुरली लाज वाचवा आयकतास ना” असा टोला परब यांना लगावला आहे.

पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’?, राजकीय वर्तुळात चर्चा

सचिन वाझे प्रकरणातही अनिल परब यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नाशिक येथील परिवहन कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर परब यांच्या अडचणीत वाढ झाली. राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात गेल्या 2 वर्षांपासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार नाशिक पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत चौकशीचे आदेश दिले. यानुसार गेल्या तीन दिवसांपासून विविध शासकीय अधिकाऱ्यांपासून खासगी व्यक्तींचीही चौकशी सुरु आहे. दरम्यान कॅबिनेट मंत्र्याविरुद्ध स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी कशी काय होऊ शकते? अनिल परब यांच्यासाठी वेगळा नियम का का? जर, संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग मातोश्रीतील खास माणसाला सहानुभूती का?, असा प्रश्न राणे Rane यांनी विचारला होता. तसेच याप्रकरणी सीबीआय चौकशीच न्याय मिळवून देईल, त्यापेक्षा काही कमी नाही, असे म्हणत सीबीआय चौकशीची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे